नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ मे रोजी कोलकातामध्ये सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन योजनांची सुरुवात करणार आहेत. याच वेळी अन्य मंत्री वेगवेगळ्या शहरांमध्ये या योजनांची सुरुवात करतील. जनधन योजनेप्रमाणेच या योजनांचीही एकाच वेळी ठिकठिकाणी सुरुवात होणार आहे.
आर्थिक सेवा सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले की, विविध राज्यांमध्ये एकाच वेळी या योजनांचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री सहभागी होणार आहेत. या योजनांची सुरुवात जनधन योजनेसारखीच होईल, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचू शकेल. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांद्वारे योजनांची सुरुवात झाल्यानंतर विमा आणि पेन्शन योजना सुरू होईल. मात्र विमा कव्हर १ जूनपासून लागू केले जाणार आहे. या योजना बँक खात्याशी जोडल्या जातील आणि प्रिमियम बँक खात्यातूनच कापून घेतले जाईल.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांद्वारे सुरू केल्या जात असलेल्या या योजनांचा उद्देश स्वस्त दराने सहजपणे सामाजिक सुरक्षा उपलब्ध करणे हा आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनांची घोषणा २८ फेब्रुवारी रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. या दोन विमा योजनांमध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) यांचा समावेश आहे. या योजनांनुसार मृत्यूबरोबरच दुर्घटनेमुळे मृत्यू-अपंगत्व आल्यास विमा कव्हर दिले जाणार आहे, तर अटल पेन्शन योजनेद्वारे (एपीवाय) वृद्धावस्थेमध्ये उत्पन्न सुरक्षेच्या गरजांची पूर्तता केली जाणार आहे.