सी विभागात इमारतींच्या दुरुस्तीमागे मोठे रॅकेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सी विभागात इमारतींच्या दुरुस्तीमागे मोठे रॅकेट

Share This
मुंबई (प्रतिनिधी)-  पालिकेचा सन 1888 मधील 342 कलमामुळे इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात येत असून यामागे मोठे रॅकेट सुरु आहे. त्यामुळे या कलमाअंतर्गत पुढील इमारत दुरुस्तीचे कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रविण छेडा यांनी आज स्थायी समितीत केली. त्याला समर्थन देत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी याविषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यता असून रस्ते रुंदीकरणाबाबत सेटबॅक मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.


दक्षिण मुंबईतील ए, बी, सी, डी विभागामध्ये 342 नुसार आतापर्यंत किती परवानग्या दिल्या गेल्यामुळे 60 फुटांचा रस्ता कसा उपलब्ध होणार, असा सवाल छेडा यांनी केला. तसेच कुठल्या आधारावर दुरुस्तीच्या परवानग्या दिल्या जातात. अशा परवानग्यामुळे रहिवाशांचे किती नुकसान होते, हे पाहणे आवश्यक आहे. यासाठी सेटबॅक घेऊनच विकास करा, अन्यथा दुरुस्तीला परवानग्या मिळणार नाही, अशी अट घालण्याची मागणी केली. तर सपाचे गटनेते रईस शेख यांनी 342 नुसार येणारे प्रस्ताव नियोजन विभागाशी चर्चा करून आणावेत अशी मागणी केली. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनीही सी विभागाचा विकास करायचा असेल तर सदर कलम रद्द करावे, अशी सूचना करीत व्यापाऱ्यांच्या हितापेक्षा जनतेचे हित लक्षात घेवून म्हाडामार्फत विकास करण्याची मागणी केली.  
दरम्यान, या विभागातील इमारती जीर्ण झाल्या असून यामुळे जिविताला मोठा धोका पोहचेल. त्यामुळे या विभागातील इमारतींची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages