मुंबई : मुंबई मनपाच्या नव्या फेरीवाला धोरणास रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. या परिस्थितीत रेल्वे स्थानकांचा योग्यरीत्या विकास करून तेथेच फेरीवाल्यांचा पुनर्विकास करावा, अशी मागणी मुंबई हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबुभाई भवानजी यांनी केली आहे. यासंबंधी भवानजी यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.
उपनगरीय रेल्वे स्थानकांची संख्या १२८ आहे. या रेल्वे स्थानकांतील फलाटांचे छत सिमेंट काँक्रीटने बनवून बहुमजली इमारत उभारावी, जेणेकरून या जागेवर फेरीवाल्यांचे योग्यरीत्या पुनर्वसन होईल. परिणामी रस्त्यावरील वर्दळही कमी होईल आणि ट्रॅफिक जाममुक्त रस्ते दिसतील, असे भवानजी यांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानकातील बहुमजली इमारतीमध्ये फेरीवाल्यांप्रमाणे वाहनांच्या पार्किंगसाठीही जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
खाजगी भागीदारी तत्त्वातून रेल्वे स्थानकावर बहुमजली इमारती उभाराव्या. यामुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर बोजा पडणार नाही. मुंबईप्रमाणेच देशभरातील इतर रेल्वे स्थानकांतही असे मॉडेल राबवण्यात यावे, अशी भवानजी यांची मागणी आहे.