शहरातील पावसाचा पालिका अतिरिक्त आयुक्तांनी घेतला धसका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2015

शहरातील पावसाचा पालिका अतिरिक्त आयुक्तांनी घेतला धसका

मुंबई (प्रतिनिधी)- शहरात किचिंतसा पाऊस झाला तरी मुंबई तुंबते. याचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होतो. त्यामुळे या वर्षीही अशी परिस्थिती ओढावल्यास काय उपाययोजना करता, येतील याबाबत आज पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी आढावा बैठक घेतली.

मुंबईत सरीवर पाऊस झाला तरी मुंबई जलमय होते. सखल भाग पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प होते. तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यंदा अशा परिस्थितीत मुंबईकरांना कशाप्रकारे सेवा देतील, याचा अभ्यास करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या आदेशानुसार आज पालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास तात्काळ सुविधा पुरविण्याची सुविधा. तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयी साबन, टॉवेल, माक्स, गमबुट, ग्लोव्हज, जाकीट, हेलमेट देण्यात येणार आहेत. तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. साथीचे रोग, दुषित पाणी, खड्डे याबाबतही ठोस उपाय योजना करण्यात याव्यात अशा सुचना दराडे यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या आहेत.

फायर ऑडिट न केल्यास न्यायालयीन कारवाई
गोळूक निवास आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेला जाग आली आहे. दिवसेंदिवस उभारण्यात येणाऱी अनधिकृत बांधकांना फायर ऑडिट सक्ती केली आहे. मात्र, तरीही फायर ऑडिट न केल्यास त्याचा गैरवापर झाल्यास त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS