अग्निशमन दलाची समुद्रकिनारी प्रात्येक्षिके - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2015

अग्निशमन दलाची समुद्रकिनारी प्रात्येक्षिके

मुंबई (प्रतिनिधी)- दरवर्षी पावसाळ्यामध्ये समुद्र किनारी फिरायला जाणाऱ्या किंवा पर्यटकांची गर्दी असते. यावेळी पाण्यात बुडुन अनेकांचा मृत्यू होतो. हे प्रमाण रोखण्यासाठी पालिका अग्निशमन दलाने यंदापासून जय्यत तयारी सुरू केली. या तयारीची आज प्रात्येक्षिके नरिमन पॉईट येथील चौपाटी व किनाऱयावर दाखविण्यात आली. या प्रात्यक्षिकांचा पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

मुंबई समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. अनेकजण समुद्राचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरतात. परंतु, काही वेळा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडणाऱ्यांची संख्या अधिक वाढते. याचा परिणाम पालिकेला सोसावा लागतो. त्यामुळे पालिकेने हे प्रमा कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनारी नागरी संरक्षण व बचाव (बीच सेफ्टी) याबाबत पॉवरबोट आणि जेट स्की यांच्या सहाय्याने कसरत करण्यात आली. गिरगाव, नरिमन पॉईंट याठिकाणी प्रादेक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये सुमारे शेकडो अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. यावेळी बुडणाऱ्या नागरिकांना बाहेर कसे काढायचे याची माहिती दिली.

दरम्यान, पालिकेने प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांची तसेच अन्य सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याप्रसंगी पालिका आयुक्त अजोय मेहताअतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुमुंबई उपनगरे जिल्हाधिकारी शेखर चन्नेमहाराष्ट्र राज्याचे अग्निशमन सल्लागार मिलिंद देशमुख व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS