निष्काळजीपणामुळे दरवर्षी पावसाळय़ात मुंबई जलमय होते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2015

निष्काळजीपणामुळे दरवर्षी पावसाळय़ात मुंबई जलमय होते

मुंबई : मुंबई मनपातर्फे दरवर्षी पावसाळय़ापूर्वी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, कंत्राटदारांचा कामचुकारपणा व पालिका अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी पावसाळय़ात मुंबई जलमय होते, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला.
पालिका प्रशासनातर्फे दरवर्षी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही पावसाळय़ात पाणी तुंबते. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून वाहतुकीची कोंडी होते, तर काही ठिकाणी लोकांच्या घराच पाणी शिरून त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईसाठी पालिकेने २५२ कोटींची तरतूद केली. पावसाळा जवळ आल्याने नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या विभागातील नालेसफाईचे काम व्यवस्थित होत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे व या कामांचे छायाचित्र काढून व त्याठिकाणचे नाव आपल्या ई-मेल आयडीवर amberkardevendra@gmail.com  व आपल्या भ्रमणध्वनीवर (९३२२२९00२७) व्हॉट्सअँपद्वारे पाठवावीत, असे आवाहन आंबेरकर यांनी केले आहे

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS