पोलीस आयुक्त रजेवर गेल्याने बदल्या रखडल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलीस आयुक्त रजेवर गेल्याने बदल्या रखडल्या

Share This
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया हे रजेवर गेल्याने पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची चर्चा सध्या पोलीस वतरुळात सुरू आहे. मारिया हे सुट्टीवरून ३ जूनला परतल्यानंतर बदल्यांच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. 

आठ पोलीस ठाण्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नसल्याने तेथील काम कनिष्ठ अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यातील अधिकारी लाच घेताना पकडल्यामुळे त्याची शिक्षा म्हणून वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. उपायुक्त व आयपीएस अधिकार्‍यांच्या मध्यंतरी बदल्या करण्यात आल्या. त्यातील मुंबईमध्ये आलेल्या अधिकार्‍यांकडे अद्यापि कोणताही पदभार दिला गेला नसल्याने हे अधिकारी केवळ हजेरी लावून रिकामे बसलेले असतात. मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांची पुण्याला बदली झाल्यामुळे तसेच पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त दोज्रे यांची पश्‍चिम प्रादेशिक विभागात नियुक्त करण्यात आल्यामुळे मध्य व पूर्व विभागांना अतिरिक्त आयुक्तच नसल्याने तेथील पदभार दुसर्‍या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. या महिनाअखेरीस पोलीस शिपायांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या केल्या जाणार आहेत. त्यांच्या बदल्यांसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अधिकार्‍यांच्या सध्या पोलीस आयुक्तालयात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या महिनाअखेरीस मुंबई पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तपदापासून शिपाई पदाचे ४६५ अधिकारी नवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी कोणाला नियुक्त करायचे, याचा विचार वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. अधिकारी व शिपायांच्या बदल्यांची तसेच नियुक्त्यांची यादी बनवण्याचे काम सध्या जोरात सुरू असून आयुक्त सुट्टीवरून परत आल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages