मुंबई (प्रतिनिधी) - खासगी भागीदारी प्रकल्पांतर्गत (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) या योजनेत सहभागी असलेल्या संस्थांनी पालिकेचे कोट्यावधी रुपये थकविले आहेत. त्यामुळे या योजनेखाली चालू असलेला गैरप्रकार रोखा अशी मागणी आज पालिकेच्या सभागृहात सदस्यांनी केली. पालिकेचे नुकसान करणाऱ्या या खासगी संस्थाकडून व्याजासहित नुकसान भरपाई वसूल करा, अशी मागणीही आज सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेच्या सभागृहात केली. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज पालिका सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते पालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. पालिकेच्या महसूलावर परिणाम करणारा पीपीपी हा विषय 66 ब अन्वये चर्चेला आणला होता. आरोग्य खात्यातही खासगी भागिदारी प्रकल्पांतर्गत खासगी संस्थांकडून पालिकेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पालिकेने खासगी संस्थाना मुंबईत अनेक ठिकाणी डायलेसिस सेंटर सुरू आहेत. मुंबईतील अनेक जागा खासगी रुग्णालयांना भाडे तत्वावर देताना पालिकेने घातलेल्या अटींचे पालन खासगी संस्था करीत नाहीत. अंधेरी येथील ब्रम्हकुमारी रुग्णालयाचीही मनमानी चालू आहे. गरीब रुगणांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या अटीवर या योजनेतील रुग्णालयांना घातल्या आहेत. मात्र पालिकेने घालून दिलेल्या अटींचे पालन होत नाही. ज्या संस्थाकडून पालिकेला येणे बाकी आहे. अशा संस्थांकडून पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व्याजासहित थकबाकी वसूल करा अशी मागणी नगरसेवक व्यास यांनी केली. यावेळी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज या संस्थेने पालिकेचे 10 कोटी रुपये थकविल्याचा माहिती नगरसेवक व्यास यांनी आज पालिकेच्या सभागृहात दिली. तसेच इमामपाडा मॅटर्निटी होम कडून पालिकेला 21 लाख 86 हजार 805 रुपये येणे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, संबंधित वैद्यकीय संस्थेबरोबर सन 2009 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. परंतु, डीवाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राजावाडी व भाभा रुग्णालयात प्रशिक्षण देण्याबाबतचा करार झाला होता. मात्र, रुग्णालयाने विकास करण्याचे आश्वासन दिले असताना त्यांनी पाळलेले नाही. तसेच काही रक्कम थकवली आहे. त्यावर 9 ऑगस्ट 2013 ला व 2014 मध्ये नोटीस बजावल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी सांगितले. तसेच रुग्णालयाचा वापर करण्यास मनाईही करण्यात आली असून त्याबाबतची आर्थिक नुकसानीची मोजनी खासगी सनदी लेखापालाकडून सुरू असल्याचे श्रीनिवासन म्हणाले.