मुंबई (प्रतिनिधी)- काळबादेवी येथील गोकूळ निवास इमारतीला ९ मे रोजी आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद व दोन गंभीर जखमी झाले. तब्बल चार तास आगीच्या मुद्द्यावर सर्वपक्षिय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर जाग आलेल्या प्रशासनाने अग्निशमन दलाबाबत फायर ऑडिट करण्यासाठी फायर अक्ट सेल उभारण्याची घोषणा केली.
याबाबत, अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी स्पष्टकरण करताना, शहरातील व उपनगरातील सर्व इमारतींचे लवकर फायर ऑडिट केले जाईल. त्यासाठी फायर अक्ट सेल स्थापन करणार असून याकरिता ९९ अग्निशमन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांना एनओसी देण्याचे अधिकार नसतील. तसेच मुंबईतील उंच इमारतीच्या आगी विझविण्यासाठी ९० मीटरची शिडी घेणार असून याशिडी जून- जूलैमध्ये अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होतील. शिवाय, ४२ मीटरची एरियल प्लेटफॉमही आणण्यात येणार आहे. ६ कंमाज सेंटर कार्यान्वित होणार आहेत. यामध्ये बोरीवली, मरोळ, वडाळ हे तीन कंमाड सेंटर अंशतः कार्यान्वित झाले आहेत. भायखळा सेंटरचे काम सुरू आहे. तर मानखुर्द , विक्रोळी सेंटर काम ही प्रगतीपथावर आहे. तसेच १६ फायर इंजिन खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फायर हाटड्रंटबाबत बोलताना म्हणाले की, मुंबईत १० हजार ५०० हाटड्रेंट असून त्यापैकी ९० टक्के बंद अवस्थेत आहेत. हे जलवाहिनीत २४ तास पाणी व्यवस्था नसल्यामुळे बंद आहेत. तर काही रस्ते, पदपथाखाली गाढले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, २४ तास पाणी नसल्यामुळे ते बंद असून आता चार तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यामुळे निदान तेवढा वेळ तरी हे हायड्रंट कार्यन्वितकेले जाणार आहेत. तसेच खेळाच्या मैदानावर व मनोरंजनाच्या ठिकाणी नविन अग्निशमन दल केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. तर फ्लायओव्हर ब्रीजखालीही अग्निशमन केंद्र सुरु करण्याबाबत लिगल विभागाचा सल्ला घेण्यात येणार आहे. उंच इमारतींमधील आगी विझविण्यासाठी अंतर्गत यंत्रणा उभारण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी डिसी सेलमध्ये तशी तरतूद करण्यात आल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.

