रक्तपेढी सेवाशुल्कात २00 रुपयांनी कपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रक्तपेढी सेवाशुल्कात २00 रुपयांनी कपात

Share This
मुंबई : शासकीय रक्तपेढीतील आकारल्या जाणार्‍या सेवाशुल्कात शासनाने २00 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण रक्त आणि तांबड्या रक्तपेशींची पिशवी ८५0 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याविषयीचा शासन अध्यादेश आरोग्य विभागातर्फे नुकताच काढण्यात आला आहे.


गेल्यावर्षी जूनमध्ये रक्तावरील सेवाशुल्कात शासनाने वाढ केली होती. त्यामुळे पूर्वी शासकीय रक्तपेढीत प्रत्येकी ४५0 रुपयांना मिळणारे पूर्ण रक्त व तांबड्या रक्तपेशींसाठी प्रतिपिशवी १0५0 रुपये आकारले जाऊ लागले. आता हे सेवाशुल्क २00 रुपयांनी कमी करून प्रत्येकी ८५0 रुपये ठेवण्यात आले आहे. हे सुधारित दर स्वस्त केल्याचे शासनाकडून दाखवण्यात आले असले तरी पूर्वीच्या शुल्कापेक्षा आजही हे दर दुप्पट असल्याचे चित्र आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages