एसआरएच्या एक हेक्टरवर ६५० पेक्षा जास्त सदनिका बांधण्याच्या प्रकल्पासाठी आता मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठविण्याची गरज पडणार नाही. या प्रकल्पांना जागेवर चार एफएसआय वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
२७० चौ. फूट क्षेत्रफळाच्या सदनिका झोपडपट्टीधारकांना बांधून देण्यात येतात. तसेच संबंधित बिल्डर खुल्या बाजारात विक्रीसाठी सदनिका बांधेल. त्यासाठी एफएसआय वापरून झाल्यानंतर उरलेला टीडीआर संबंधित बिल्डर अन्य ठिकाणी वापरू शकेल. वाढीव एफएसआय आणि मोठ्या प्रकल्पांच्या परवानगीसाठीचे मंत्रालयातले खेटे टळल्यामुळे रखडलेल्या एसआयए योजनांना गती येईल, असा सरकारचा दावा आहे.
म्हाडा प्रकल्पांसाठी ३ एफएसआयम्हाडाच्या मोठ्या प्रकल्पांच्या परवानगीसाठीही आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची गरज पडणार नाही. म्हाडा पुनर्विकासात रहिवाशांना ३०० चौ. फुटाची सदनिका देते. म्हाडाच्या प्रकल्पांसाठी आता अडीच एफएसआयवरून तीन एफएसआय देण्यात आला आहे