आर्थिक तोट्याच्या नावाखाली बेस्टने भटक्या समाजातील १६ कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2015

आर्थिक तोट्याच्या नावाखाली बेस्टने भटक्या समाजातील १६ कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले

मुंबई (प्रतिनिधी) - बेस्ट आर्थिक तोट्यात असल्याचे कारण देऊन बेस्टने भटक्या विमुक्त समाजातील १६ कर्मचार्‍यांना नोकरिवरून काढले आहे. हे सर्व कर्मचारी विद्युत विभागातील असून चालकपदावर कार्यरत होते. मात्र बेस्ट प्रशासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या १६ कर्मचार्‍यांवर आणि त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.

हे १६ कर्मचारी ज्युनियर ग्रेडचे कर्मचारी आहेत. सध्या भटक्या जातीतील पदे रिक्त नाहीत. रिक्त होताच त्यांना पुन्हा कामावर घेऊ असे सांगण्यात येत आहे. २०१२ मध्ये विद्युत विभागातील चालकांच्या रिक्त पदांवर त्यांची भरती केली होती. टप्प्या टप्प्याने त्यांची पदे भरण्याचे आश्‍वासन प्रशासनाने त्यांना दिले होते.

या कर्मचार्यांना ५,९३० बेसिक वेतनानुसार १६ हजार रुपये दरमहा वेतन त्यांना देण्यात येत होते. या कर्मचार्‍यांना इतर सुविधाही देण्यात येत होत्या. मात्र बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याचे सांगून आणि पदे रिक्त नसल्याचे कारण देऊन ८ एप्रिल रोजी तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याचे किरण क्षीरसागर यांनी सांगितले.  बेस्ट प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला असून त्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देतानाच प्रसंगी न्यायासाठी न्यायालयात धाव घेऊ असे क्षीरसागर यांनी सांगीतले.

बेस्ट प्रशासनाने तडकाफडकी कामावरून काढून टाकलेल्या त्या १६ कर्मचार्‍यांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व माहिती जाणून घेण्यात आली. त्याबाबत सोमवारी प्रशासन अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच त्या १६ कर्मचार्‍यांबाबत निर्णय घेण्यात येईल असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS