गोरेगावमध्ये ४५0 आसनांचे नाट्यगृह उभारण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2015

गोरेगावमध्ये ४५0 आसनांचे नाट्यगृह उभारण्यात येणार

मुंबई : गोरेगाव पश्‍चिमेला असलेल्या टोपीवाला बाजाराच्या इमारतीचे रुपडे येत्या तीन वर्षांत पालटणार असून येथील २0६ गाळेधारकांना पुन्हा तेथेच जागा देऊन, बाजाराच्या वर ४५0 आसनांचे भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. या बाजाराच्या नूतनीकरणासाठी पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामाची पाहणी पालिकेच्या मंडया व बाजार समितीचे अध्यक्ष अजित भंडारी यांनी शुक्रवारी केली. हे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

येथे २0६ गाळेधारक असून ते येथे गेली बरीच वर्षे व्यवसाय करत आहेत. यामुळे त्यांना नूतनीकरणानंतर आणखी मोठी निदान सध्यापेक्षा ५0 टक्के जास्त जागा मिळावी, अशी मागणी या व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष संजय अगरवाल यांनी भंडारी यांच्याकडे केली. या मागणीचा विचार करू तसेच याबाबतचा प्रस्ताव तुमच्या वास्तुविशारदांमार्फत सादर करा, असे भंडारी यांनी त्यांना सांगितले. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक राजू पाध्ये यांनीही या वेळी भंडारी यांची भेट घेऊन या व्यापार्‍यांची मागणी रास्त आहे, असे सांगितले. या बाजाराची इमारत पाडण्याचे काम सुरू झाले असून ते पावसाळ्याआधी होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीत उभारण्यात येणार्‍या नव्या इमारतीमध्ये बेसमेंट व पहिल्या मजल्यावर ४५00 चौरस फूट जागेवर भव्य वाहनतळ बांधण्यात येणार असून शेवटच्या मजल्यावर ४५0 आसनी भव्य नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS