पावसाळ्यासाठी अग्निशमन दल सज्ज - सहा ठिकाणी रेस्क्यू टीम तैनात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळ्यासाठी अग्निशमन दल सज्ज - सहा ठिकाणी रेस्क्यू टीम तैनात

Share This
मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना दरवर्षी घडतात. परिणामी नागरीकांची गैरसोय आणि वाहतूकीची कोंडी होती. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने सहा ठिकाणी रेस्क्यू टीम तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबईत थोडा जरी पाऊस झाला तरी सखल भागात पाणी तुंबते. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तर नागरिकांनाही त्याचा फटका बसतो. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना या दिव्य सकंटातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी पाणी तुंबणाऱ्या परळ, कुर्ला, बीकेसी, सायन, बोरीवली आणि अंधेरी या परिसरात रेस्क्यू टीम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये 60 प्रशिक्षित जवानांचा समावेश केला आहे. एका टिममध्ये आठ ते दहा जवानांचा असतील. पावसाळ्यात पाणी साचलेल्या ठिकाणाहून नागरिकांच्या मदत करतील. सहा ठिकाणी रात्रंदिवस हे जवान तैनात राहतील अशी, माहिती पालिका अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासही मदत करतील, असे ते म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages