'सर्व शिक्षा अभियान'मधील 'त्या' १० कर्मचार्‍यांना अखेर थकीत पगार दिला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'सर्व शिक्षा अभियान'मधील 'त्या' १० कर्मचार्‍यांना अखेर थकीत पगार दिला

Share This
मुंबई : महापालिकेच्या 'सर्व शिक्षा अभियान'मधील काम करणाऱ्या 'त्या' १० कर्मचार्‍यांना गेले ८ महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. याबाबत शिक्षण समिती मध्ये जोरदार चर्चा झाली होती. यावेळी लवकरात लवकर या कर्मचार्यांना पगार देण्यात येईल असे शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी दिले होते. तावडे यांनी दिलेल्या आश्वासना नंतर उप आयुक्त रमेश पवार आणि शिक्षण अधिकारी शांभवी जोगी यांनी प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांचा थकित असलेला पगार काढला आहे. 


११ लाख ६८ हजार ३१७ रुपयाचा चेक काढून संबंधित १० कर्मचार्यांच्या बँक खात्यात इसीएस द्वारे वळता करण्यात आल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे. या कर्मचार्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. याबाबत एसपीडी च्या सुवर्णा खरात यांना उप आयुक्त रमेश पवार यांनी पत्र दिले आहे. खरात यांची मी स्वतः भेट घेवून लवकरात लवकर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सांगणार आहे असे तावडे यांनी सांगितले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages