मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी आगीशी झुंज देताना इतरांच्या जिवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करताना मृत्यूमुखी पडत असतात. मृत्यूमुखी पडणाऱ्या कर्मचारयांच्या कुटुंबियाना अनुकंपाची भिक नको तर अश्या कर्मचाऱ्यांना शहीद जाहिर करून विशेष बाब म्हणून सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनचे रमाकांत बने यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना अग्निशमन दलातील कर्मचार्याचा 50 लाख रुपयांचा विमा काढावा. अग्निशमन दलामध्ये आग विझवणाऱ्या 346, वर्कशॉप मधील 48, आस्थापनेवरील 37, आणि इत्यादी अशी एकूण 626 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे त्वरित भरावीत. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना ओव्हर टाइम मिळावा, अधिकाऱ्यांना 1000 रुपये जोखीम भत्ता मीळतो त्याप्रमाणेच कर्मचार्यानाही जोखीम भत्ता मिळावा, मूलभुत सुविधा द्याव्यात अश्या मागण्या बने यांनी केल्या. या मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले असून लवकरच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद् आयोजीत करणार असल्याचे बने यांनी सांगीतले.