मुंबई - मुंबईतील नालेसफाईच्या कामाचे नियोजन महापालिका प्रशासनाने योग्य पध्दीने केले असले तरी कंत्राटदार गाळ काढून जी आकडेवारी सांगत आहेत. त्याची सत्यता त्यांच्या गाळ मोजण्याच्या काटयावर अवलंबून आहे. त्या काटयाचे फोन नंबर न लागणे, पावत्या उपलब्ध न होणे यातून शंका घ्यावी अशी परिस्थिती दिसून येते आहे, असे सांगत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी नालेसफाईची कामे करणाऱया कंत्राटदारांची कामे पारदर्शी नसून समाधान व्यक्त् करावे अशी कामे झालेली नाहीत असेही त्यांनी सांगितले.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि उपमहापौर अलका केरकर यांच्यासह पालिका गटनेते मनोज कोटक यांनी आज पूर्व उपनगरातील नालेसफाईची आज पाहणी केली. पालिका अधिकारयांच्या उपस्थितीत मिठी नदी येथून या दौऱयाला सुरूवात झाली. कामगार नगर, माहूल खाडी, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील देवनार नाला, सोमय्या नाला, लक्ष्मीबाग नाला, नाहूर नाला, नानेपाडा नाला या नाल्यांची पहाणी यावेळी करण्यात आली.
या दौऱयात शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे, विधी समिती अध्यक्ष महेश पारकर, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, आरोग्य समिती अध्यक्ष सुनिता यादव यांच्यासह नगरसेवक ज्ञानमुर्ती शर्मा, राजश्री शिरवाडकर, समिता कांबळे आदी नगरसेवक सहभागी झाले होते.
दरवर्षी नालेसफाईची कामे करताना कंत्राटदार गाळाची आकडेवारी जाहीर करतात. हा गाळ ज्या काटयावर मोजला जातो त्या काटयाबाबतच आमदार आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी या दौऱयात गाळ मोजण्याचा काटा व मोजणीच्या पावत्यांची कत्राटदारांकडे मागणी करून ती तपासून पाहिली. अनेक कंत्राटदरानं पावत्या दाखविण्यात असमर्थ्ता दर्शविली. त्यामुळे कंत्राटदार जी आकडेवारी देत आहे त्यावरच मुंबईकरांची पावसाळी सुरक्षा अलवंबून आहे. याबाबत महापालिका अधिकाऱयांनी लक्ष घ्यावे, अशा सूचनाही आमदार शेलार यांनी आधिकाऱयांना केल्या. तर याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करावी अशा सूचना त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱयांना दिल्या.

