मरणाच्या दारात असलेल्या अग्निशमन अधिकार्याला पदोन्नती द्यायला पालिकेला आली जाग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मरणाच्या दारात असलेल्या अग्निशमन अधिकार्याला पदोन्नती द्यायला पालिकेला आली जाग

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव 
काळबादेवी येथील आगीत ९० टक्के जळाल्याने मृत्युच्या दारात असलेल्या मुंबई अग्निशमन दलातील सुधीर अमीन या अधिकाऱ्याला पदोन्नती देण्याचा गेले ५ महिने दाबून ठेवलेला प्रस्ताव पालिकेतील सत्ताधार्यांनी पालिका सभागृहापुढे आणला असल्याने सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शनिवारी कालबादेवी येथे लागलेल्या आगीमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि सुधीर अमीन हे अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीररित्या जखमी असलेल्या सुधीर अमीन यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विधी विभागाने जानेवारी महिन्यात पालिका सभागृहाकड़े पाठवला होता. परंतू गेल्या ५ महिन्यात हां प्रस्ताव पालिकेतील सत्ताधार्यानी दाबुन ठेवला होता. पालिका सत्ताधार्यानी वेळीच हां प्रस्ताव मंजूर केला असता तर अमीन यांना ५ महिने अग्निशमन दलात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करता आले असते. परंतू शिवसेना आणि भाजपा सत्ताधार्यानी हां प्रस्ताव गेले ५ महीने दाबुन ठेवल्याने अमीन यांना पदोन्नती मिळू शकलेली नाही. आज अमीन हे काळबादेवी येथील आगीमधे ९० टक्के जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती अतीशय गंभीर आहे. अशी परिस्थिती असताना अमीन याना पदोन्नती दिली जाणार आहे.  पालिकेतील सत्ताधार्यानी हां प्रस्ताव ५ महीने दाबून का ठेवला, अमीन यांना वेळीच पदोन्नती का दिली नाही असे प्रश्न नगरसेवक प्रवीण छेड़ा यांनी उपस्थीत केले आहेत. अमीन यांना पदोन्नती उशीरा देण्यास सत्ताधारी शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा आरोप छेड़ा यांनी केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages