अग्निशमन दलावर मंजूर निधी पैकी २. १६ टक्केच खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलावर मंजूर निधी पैकी २. १६ टक्केच खर्च

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्यासाठी पालिकेने मंजूर केलेल्या २६२ कोटी निधी पैकी फ़क्त २. १६ टक्के निधी खर्च करत असेल तर अग्निशमन दलाची काय अवस्था असेल, दल आगीशी मुकाबला करण्यासाठी सक्षम कसे बनेल असे प्रश्न माजी खासदार संजय निरुपम यांनी उपस्थित केले आहेत. 

कालबादेवी आगी नंतर संजय निरुपम यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीनंतर निरुपम पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना अंधेरी लोटस पार्क ला लागलेल्या आगीचा अहवाला दाबला आहे. यामध्ये भाजपाशी संबंधीत बिल्डर असल्याने कारवाई करण्यास दिरंगाई केली जात आहे. या बिल्डरवर त्वरित कारवाई करावी. मुंबईमध्ये अग्निशमन केंद्रे कमी आहेत या केंद्रांची संख्या वाढवावी. मुंबईमध्ये एकूण 10497 हायड्रंट आहेत त्या पैकी 9400 हायड्रंट बंद अवस्थेत आहेत. ही हायड्रंट त्वरीत सुरु करावीत अशी मागणी निरुपम यांनी केली.

अग्निशमन दलाचे भूखंड खाजगी विकासकाना दिले जात आहेत. विकासकाना असे भूखंड दिल्यास अग्निशमन केंद्रे कुठे उभारणार. मुंबईमधे अनेक इमारती या 50-55 माळ्याच्या बनत असताना अग्निशमन दलाकड़े तितक्या उंच शिड्या नसल्याने नागरिकांचा जीव कसा वाचवला जाइल असे प्रश्नही निरुपम यांनी उपस्थित केले.



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages