राज्य शासन व महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई तयार करुया – मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य शासन व महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई तयार करुया – मुख्यमंत्री

Share This
मुंबई / प्रतिनिधी - देशाला माहिती व तंत्रज्ञानात अग्रेसर करण्यात प्रमोद महाजन यांचा सिंहाचा मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने ही उपयुक्त असून राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई तयार करुया असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दादर (पश्चिम) येथील ‘प्रमोद महाजन कला पार्क’ चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना पुढे म्हणाले की, प्रमोद महाजन यांच्या नावाला साजेसे असे उद्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. एखादी गोष्ट नजरेसमोर आणून ते पूर्ण करण्याची हातोटी प्रमोद महाजनांकडे होती. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी तो गुण देऊन राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. टेलिकम्युनिकेशन क्रांतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाजीवाला, रिक्षावाल्याकडे ज्या दिवशी भ्रमणध्वनी असेल तो दिन सुगीन दिन असल्याचे प्रमोद महाजन यांचे मत होते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सूक्ष्म नियोजनामध्ये प्रमोद महाजन यांची हातोटी होती. परिपूर्णतेमध्ये त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. गुणवत्तेचे अत्युच्च शिखर त्यांच्यामध्ये पहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय स्तरासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. आज तयार झालेली नेतृत्वाची फळी ही त्यांचे देणे असून अनेकांना सावली देणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते, असे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. 

महापौर स्नेहल आंबेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, उदंचन केंद्राच्या जागी उद्यानाची कल्पना ही अप्रतिम असून उद्यानात २५ हजार ९०० चौ.मी.वर १४० प्रजातींची १ लाखांहून अधिक शोभिवंत फुलझाडे व झुडपे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांना मोकळा श्वास मिळावा यासाठी चांगल्या उद्यानांची निर्मिती करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संकल्पना होती. त्यानुसार आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाने ती संकल्पना पूर्ण करण्याच्या कामाचा प्रारंभ झाला आहे.येणाऱया काळात ३० ते ३२ उद्यानांचा आपण विकास करणार असून आजपासून त्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे महापौर आंबेकर यांनी सांगितले. प्रमोद महाजन यांचे कर्तृत्व, नेतृत्व, प्रेम यामुळे आज आपण येथे सर्वजण जमलो आहोत. त्यांच्या कर्तृत्वाला शोभेसे असे उचित नाव या उद्यानाला महापालिकेने दिले असल्याचे महापौर यांनी सांगून युतीचे शिल्पकार असलेले प्रमोद महाजन यांच्या एकंदरीत कार्य कर्तृत्वाचा महापौर आंबेकर यांनी आपल्या भाषणात यावेळी आढावा घेतला.

Displaying BMC_7535.JPG

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages