३६ कालबाह्य कायदे रद्द ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

३६ कालबाह्य कायदे रद्द !

Share This
नवी दिल्ली : कालबाह्य झालेले ३६ कायदे रद्द करण्याच्या एका महत्त्वाच्या विधेयकाला गुरुवारी संसदेत मंजुरी देण्यात आली. गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये लोकसभेने या विधेयकाला मंजुरी दिली होती. राज्यसभेने या महिन्याच्या सुरुवातीला काही दुरुस्त्या सुचवत याला मंजुरी दिली होती. त्यानंतर पुन्हा हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले असता संशोधित विधेयकाला मंजुरी मिळाली.


कायदामंत्री डी. व्ही. सदानंद गौडांनी हे संशोधन लोकसभेसमोर सादर केले. या विधेयकानुसार कालबाह्य झालेल्या काही संशोधित व काही मूळ कायद्यांना कायदा पुस्तिकेतून हटविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानुसार लोकप्रतिनिधी कायदा, विवाह कायदा, निवडणूक कायदा, घटस्फोट कायदा, आनंद विवाह कायदा असे कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages