कोकण रेल्वे - एलटीटी - मडगाव तत्काळ ८ विशेष गाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकण रेल्वे - एलटीटी - मडगाव तत्काळ ८ विशेष गाड्या

Share This
मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण आणि गोव्याकडे जाणार्‍या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कारण मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान आठ तत्काळ विशेष गाड्या सोडणार आहे. या गाड्यांमध्ये तत्काळ दर आकारण्यात येणार असल्याचे प्रवाशांनी लक्षात घ्यावे. या गाड्यांचे आरक्षण ८ मेपासून खुले होणार आहे.
0१00५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ९ आणि १६ मे रोजी मध्यरात्री 00.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे सकाळी साडेअकरा वाजता पोहोचेल. 0१00६ विशेष गाडी मडगाव येथून ९ आणि १६ मे रोजी दुपारी १२.३0 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे २३.४५ वाजता पोहोचेल. 0१0४५ विशेष गाडी १0 आणि १७ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 0१.१0 वाजता सुटेल आणि मडगाव येथे १२.३0 वाजता पोहोचेल. 0१0४६ ही विशेष गाडी मडगाव येथून १६.00 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसर्‍या दिवशी 0३.३0 वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे. वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा एक डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे दोन डबे, शयनयान श्रेणीचे सात डबे, द्वितीय श्रेणीचे ६ आणि २ गार्ड ब्रेक अशी गाडीची रचना आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages