कुलाब्यातील पाणीप्रश्नासाठी सत्तेविरोधात स्थानिक आमदाराचे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुलाब्यातील पाणीप्रश्नासाठी सत्तेविरोधात स्थानिक आमदाराचे आंदोलन

Share This

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेप्रमाणेच भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यानंतरही कुलाबा, काळबादेवी, भुलेश्वर, चिराबाजार या विभागातील पाणीप्रश्न मिटलेला नाही़. पाणी माफियांची तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आता आपली सहनशक्ती संपली असून विभागातील लोकांच्या सुविधांसाठी २९ मे रोजी पालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी दिली. 

मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतल्यानंतर पुरोहित यांनी मुंबई महानगरपालिका पत्रकार कशाला भेट दिली यावेळी बोलताना ए विभाग कार्यालयातील पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथील पाणी माफियांशी संगनमत केले आहे़ झोपडपट्ट्यांमध्ये काही ठिकाणी जलजोडणी असून पाणी नाही, तर काही ठिकाणी जलजोडणी नाही, अशी अवस्था असल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे़. पाण्याचा प्रत्येक कॅन २० रुपयांना विकणाऱ्या या पाणी माफियांची दररोजची कमाई १५ लाख रुपये असल्याचा खळबळजनक आरोपही पुरोहित यांनी केला आहे़
कुलाबामधील गीता नगर, गणेशमूर्ती नगर, धोबीघाट, ट्रान्झिट कॅम्प, आंबेडकर नगर, मच्छीमार नगर, महात्मा फुले नगर, आझाद नगरी, सुंदर नगरी आदी झोपडपट्ट्यांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़. जुन्या चाळींचीही अशी अवस्था आहे़. येथील रस्त्यांची परिस्थितीही दयनीय आहे़ याबाबत अनेक तक्रारी व सरकारबरोबर बैठका घेऊनही प्रश्न सुटलेला नाही, असे पुरोहित यांनी सांगितले. पुरोहित यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची गुरुवारी पालिका मुख्यालयात भेट घेतली़ या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे सांगितले असले तरी आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages