गृह खात्यातील लाचखोर क्लार्कला अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गृह खात्यातील लाचखोर क्लार्कला अटक

Share This
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईचा धडाका सुरूच असून शुक्रवारी गृह खात्यातील क्लार्कला मंत्रालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. भीमसेन तांडेल असे त्याचे नाव असून फाइल परत देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.

नवी मुंबईत सिक्युरिटी एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या कंपनीला सिक्युरिटी लायसन्स मिळावे, यासाठी फेब्रुवारी महिन्यात गृह खात्याकडे अर्ज केला होता. मात्र, एजन्सी मालकाने गृह खात्यात कार्यरत असलेल्या तांडेल याच्याकडे अर्ज परत मागितला. अर्जाची कागदपत्रे परत देण्यासाठी तांडेल याने १० हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी एजन्सी मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages