पे अण्ड पार्किंच्या फ्लॉटवर हुक्का बार आणि हॉटेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पे अण्ड पार्किंच्या फ्लॉटवर हुक्का बार आणि हॉटेल

Share This
मुंबई (प्रतिनिधी)- पालिकेच्या भुलाबाई देसाई रोडवरील पे अण्ड पार्किंगच्या भुखंडावर पालिकेच्या दुर्लक्षामुळे गोलमाल सुरू आहे. पीपीपी तत्वाखाली पार्किग, वेल्फेअर सेंटर आणि सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. पंरतु,आकृती ठेकेदाराने त्याचा गैरवापर हॉटेल आणि हुक्का बारसाठी केला आहे. त्यामुळे या हॉटेल आणि हुक्काबारवर सीलकरून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे. तसेच, त्याचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली. आज केलेल्या पहाणी दौऱ्या दरम्यानहे आदेश देण्यात आले.तर प्रकरणाची ठोस चौकशी करणार असल्याचे पालिका डी विभागाचे सहाय्यक आयुक्त देवदास क्षीरसारग यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेने महालश्र्मी भुलाबाई देसाई रोडवरील जॉन्सन अण्ड जॉन्सन गार्डन शेजारील पेअण्ड पार्किंगसाठी १०५६ चौरस मीटरचा आरक्षित असलेला पीपीपी तत्त्वावर आकृती ठेकेदाराला दिला.ठेकेदाराने प्राथमिक करारार्गत २० मजली पार्किंग इमारत बांधली. ही इमारत खासगी ५ मजली इमारतीच्या मागे बांधली. तर खासगी ४ मजली इमारत हॉटेलसाठी दिली. या हॉटेल मध्ये कायदे व नियम धाब्यावर बसवून हुक्कापार्लर चालविले जात असल्याचे निर्दशनात आले. सन २००९ते २०१४ या कालावधीत प्राथमिक कराराच्या नावा खाली आपल्याकडे त्याचा बेकायदेशीर वापर केला आहे.आज केलेल्या पहाणी दौऱ्या प्रसंगी हा प्रकार समिती सदस्य आणि पत्रकारांना आढळून आला. इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक शौचालय असल्याचे माहितीच नसल्याची बाब पूढे आली. तर इमारतीच्या मजल्यावर बेकायदेशीर लिप्टचा वापर, जिन्यावर जळती शेगडी, गॅससिलेंटरच्या वरीलबाजूस जळती अगरबत्ती, गच्चीवर किचन व अडगळीचे सामान नजरेस आले. तर वेल्फेअरसेंटरचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केल्यामुळे लाद्या उखड्याचे दिसून आले. मात्र,याबाबत कोणतीही माहिती पालिकेला दिली नसल्याचे प्रशासानाचे सांगितले.

यावेळी समिती अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे संतत्प झालेले अध्यक्ष फणसे आणि समिती सदस्या किशोरीपेडणेकर यांनी धारेवर धरत या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले.तसेच. हॉटेलचे सील ठोकून त्यांचे परवाने रद्द करावेत, ठेकेदाराचा करार रद्दकरावा, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, असेसूचना केली.या पाहणी दौऱ्या प्रसंगी समिती अध्यक्ष यशोधर फणसे,किशोरी पेडणेकर, प्रविणछेडा आदी उपस्थित होत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages