मुंबई,(प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या शाळामध्ये विध्यार्थीची संख्या वाढवण्यासाठी पालिकेकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये विध्यार्थीना २७ शाळाप्योगी वस्तू मोफत दिल्यानंतरही पालकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही . त्यांना शाळेत येण्यास प्रवूत करण्याच्या दृष्टीने यापुढे विध्यार्थीचे गणवेश धुवण्यासाठी प्रत्येक शाळेत लौन्ड्री बसविण्यात येणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी सांगितेले.लौन्ड्री सीएसआरच्या माद्यमातून बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्पोरेट कंपन्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून नफ्यातील दोन टक्के रक्कम सरकारला द्यावी लागते. त्याच्या माध्यमातून सदर योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आपण अशा अनेक कंपन्यांना आमंत्रित करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. केंद्राकडून सौरउर्जा सबसिडी मिळत असल्याने सर्व लौन्ड्री सौरउर्जेवर चालवण्यात येणार आहेत. याचा पायलट प्रोजेक्ट घाटकोपर येथील माणिकलाल शाळेत होणार असून पंतप्रधान स्वचछता योजनेंतर्गत सदर योजना राबवण्यात येणार असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले. तसेच निमॅल नरेंद्र शालेय अभियान असा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षां पासून ही योजना राबविली जाणार आहे. पालिका शाळेच्या पत्येक इमारती मध्ये लौन्ड्री असणार आहे.
या योजनेनुसार प्रत्येक विध्यार्थी एक गणवेश शाळेतील लौन्ड्री मध्ये धुवून दिला जाणार असून त्याच्याबरोबर शर्टाचे तुटलेले बटन, हूक्स वगैरेही शाळेतच शिवून दिले जाणार आहे. या लौन्ड्रीतील साबणाचे पाणी टोयलेटच्या फ्लशसाठी वापरले जाणार आहे. यासाठी एक महिला हाउसकीपिंग आणि एक सिएसआर ची महिला यासाठी कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले.