केंद्रीय माहिती आयुक्तालयात ४0 हजार प्रकरणे प्रलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2015

केंद्रीय माहिती आयुक्तालयात ४0 हजार प्रकरणे प्रलंबित

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयुक्तालयात (सीआयसी) मुख्य आयुक्तपद रिकामे असतानाच प्रलंबित माहिती अधिकार कायदा 'आरटीआय' अर्जांची संख्या ४0 हजारहून अधिक झाल्याचे सोमवारी पुढे आले आहे. सीआयसीच्या माहितीनुसार, ४0,0५१ प्रलंबित आरटीआय अर्जांमध्ये ३२,५३१ अपील आणि ७,५२0 तक्रारींचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, तब्बल १५,७३६ अपील एकट्या मुख्य माहिती आयुक्तांच्या पीठाकडे प्रलंबित असून उर्वरित प्रकरणांची जबाबदारी विजय शर्मा, बसंत सेठ, यशोवर्धन आझाद, शरत सभरवाल, मंजुला पराशर, एम. ए. खान युसूफी व मदभूषणम श्रीधर आचार्युलू या सात माहिती आयुक्तांकडे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS