मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १४५ माध्यमिक शाळांचा यंदाच्या शालान्त माध्यमिक परीक्षेचा एकूण सरासरी निकाल ७२.५४ टक्के इतका लागला आहे. सन २0१४ च्या तुलनेत यंदा निकालात ३ टक्के वाढ झाली असून ९0 टक्केपेक्षा जास्त निकाल नोंदविणार्या शाळांची संख्याही गतवर्षाच्या १२ वरून यंदा १९ इतकी झाली असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या १४५ माध्यमिक शाळा आहेत. यामधून एकूण १0 हजार ७८१ विद्यार्थी शालान्त माध्यमिक परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार ८२0 विद्यार्थी (७२.५४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी (२0१४) १४५ माध्यमिक शाळांमधून ११ हजार ३0३ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ८५५ विद्यार्थी (६९.६0 टक्के) उत्तीर्ण झाले होते. यंदा महापालिकेच्या एकूण ४९ अनुदानित माध्यमिक शाळांमधून ६ हजार २४५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले, पैकी ४ हजार ४९४ विद्यार्थी (७१.९६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी अनुदानित माध्यमिक शाळांचा निकाल ६९.११ टक्के इतका होता, त्यात यंदा सुमारे ३ टक्के वाढ झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ९६ विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधून ४ हजार ५३६ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३ हजार ३२६ विद्यार्थी (७३.३२ टक्के) उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विनाअनुदानित माध्यमिक शाळांचा निकाल ७0.१0 टक्के इतका होता, त्यातही सुमारे ३ टक्के वाढ झाली आहे. ९0 टक्के व त्याहून अधिक निकाल लागलेल्या शाळांची संख्या यंदा १९ इतकी असून गतवर्षीच्या १२ शाळांच्या तुलनेत त्यात ७ ने वाढ झाली आहे. ८0 ते ८९.९९ टक्के निकाल नोंदविणार्या २७ शाळा (२0१४ मध्ये २१), ७0 ते ७९.९९ टक्के निकाल नोंदविणार्या शाळा ३३ (२0१४ मध्ये ३६), ६0 ते ६९.९९ टक्के निकाल नोंदविणार्या शाळा ३६ (२0१४ मध्ये २८) इतक्या आहेत.