चीटफंड कंपन्यांकडून ४0 हजार कोटींची फसवणूक - चौकशीची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चीटफंड कंपन्यांकडून ४0 हजार कोटींची फसवणूक - चौकशीची मागणी

Share This
मुंबई : राज्यातील १६२ बोगस चीटफंड कंपन्यांनी छोट्या छोट्या गुंतवणूकदारांची जवळजवळ ४0 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली असून याची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
या बोगस चीटफंड कंपन्यांची यादीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या कंपन्यांच्या कारभाराची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. या कंपन्यांनी देशभरातून साधारण एक लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. सेबीनेही या कंपन्यांविरोधात त्वरित कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. या कंपन्यांमध्ये समृद्ध जीवन, साई प्रसाद, ट्विंकल ग्रुप, सिट्रस रिसॉर्ट ग्रुप, सेनिक लँड अँड ग्रुप, मिराह प्रा. लि. आदींचा समावेश आहे. समृद्ध जीवन आणि साई प्रसाद या कंपन्यांना सेबीने यापूर्वीच बंदी घातली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages