पावसाळी अधिवेशन 13 ते 31 जुलै पर्यंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2015

पावसाळी अधिवेशन 13 ते 31 जुलै पर्यंत

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाची आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक 13 ते 31 जुलै 2015 पर्यंत घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.  या अधिवेशनात एकूण 14 दिवसांचे कामकाज मंजूर करण्यात आले. दिनांक 27 जुलै 2015 रोजी आषाढी एकादशी निमित्त विधानमंडळाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. 

या अधिवेशनात एकंदर 14 विधेयके सादर करण्यात येतील. तर विधानसभेत प्रलंबित असलेली 2 विधेयके मागे घेण्यात येतील. तसेच 11 अध्यादेश विधानमंडळाच्या पटलावर ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सन 2015-16 पुरवणी मागण्यांवर दिनांक 20 व 21 जुलै 2015 रोजी चर्चा आणि मतदान घेण्यात येऊन बुधवार दिनांक 22 जुलै 2015 रोजी पुरवणी विनियोजन विधेयकाला मंजूरी देण्यात येईल. गुरुवार 30 जुलै 2015 रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येईल आणि 31 जुलै 2015 रोजी विधीमंडळाचे कामकाज संपेल. कामकाजाच्या प्रथम दिवशी म्हणजे 13 जुलै 2015 रोजी प्रथम शोक प्रस्ताव मांडण्यात येईल नंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतील व शोक प्रस्तावानंतर त्या दिवसाचे कामकाज बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीला महसूल मंत्री एकनाथ खडसे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, विशेष निमंत्रित म्हणून आमदार गणपतराव देशमुख, विधानमंडळाचे प्रधानसचिव
डॉ. अनंत कळसे, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS