मुंबई - सावंतवाडी दरम्यान नवा रेल्वेमार्ग उभारणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2015

मुंबई - सावंतवाडी दरम्यान नवा रेल्वेमार्ग उभारणार


मुंबई – कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान लवकरच नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात येणार असल्याची घोषण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून हा नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेवर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. येणा-या जाणा-या रेल्वेगाड्यांसाठी एकच मार्ग असल्याने अनेकदा एखादा अपघात अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना बसतो. तसेच रेल्वेला आर्थिक फटकाही सहन करावा लागतो.
या सर्व समस्यांवरील तोडगा म्हणून कोकण रेल्वेवर स्वतंत्र रेल्वेमार्ग उभारण्यात यावा असा प्रस्ताव रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने लवकरच या नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. सीएसटी ते सावंतवाडी या मार्गावर हा नवी रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS