तलाव क्षेत्रात 24 तासात 755 मि. मि. पावसाची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2015

तलाव क्षेत्रात 24 तासात 755 मि. मि. पावसाची नोंद

मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या चांगला पाऊस पडत असून तलावांची पातळी ही झपाटय़ाने वाढत आहे.  गेल्या  24 ( 23 - 24 June ) तासात तब्बल 755 .4 आणि आजपर्यंत एकूण 4399 .8 मि . मि. पावसाची नोंद झाली आहे असाच पाऊस पुढे पडल्यास मुंबईकरांची वषाॅची चिंता लवकरच दूर होईल असा अंदाज वतॅवण्यात येत आहे


मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार,तुळशी,  भातसा, अप्पर वैतरणा, आणि मध्य वैतरणा ही सात तलावे पाणीपुरवठा करत आहेत या सातही तलावाची वषाॅची पाणी साठवण्याची क्षमता 14 लाख दशलक्ष लिटर पाण्याची आहे मुंबई सह राज्यात सुरूवात करणाऱ्या पावसाने या तलाव क्षेत्रात समाधानकारक सुरूसुरूवात केली आहे. त्यामुळे बिकट झालेल्या तलावाची रि-थीती आता चांगली सुधारत आहे. गेल्या 24 तासात या सातही तलावात 455 .4 आणि आता पर्यंत 4399 .8 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. या 24 तासात मोडकसागर मध्ये 110 .20 , तानसा मध्ये 121 .80 , विहार मध्ये 55 .40 ,  तुळशी मध्ये 109 .00 , अप्पर वैतरणा मध्ये  126 .00 , भातसा मध्ये 112 .00 आणि मध्य वैतरणा मध्ये 121 00 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे तर आता पर्यंत मोडकसागर मध्ये 442 .40 , तानसा मध्ये 350 .00 , विहार मध्ये 1023 .60 , तुळशी मध्ये 1123 .00 , अप्पर वैतरणा मध्ये 489 .80 , भातसा मध्ये 498 .00 , आणि मध्य वैतरणा मध्ये 473 .00 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा तलावाची पातळी झपाटय़ाने वाढत आहे सध्या मोडकसागर मध्ये 77114 , तानसा मध्ये 22898 , विहार मध्ये 7727 , तुळशी मध्ये 4747 , अप्पर वैतरणा मध्ये 0 , भातसा मध्ये  59100 , आणि मध्य वैतरणा मध्ये 105548 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे पालिकेच्या अहवालावरून पष्ट झाले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS