महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी परिसरांत विशेष स्वच्छता मोहिम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2015

महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी परिसरांत विशेष स्वच्छता मोहिम


मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती पल्लवी दराडे यांनी पावसाळयादरम्यान उद्भवणाऱया संभाव्य आरोग्यविषयक समस्यांना प्रतिबंध व्हावा, यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांना येत्या १० दिवसांमध्ये त्यांच्या क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर विशेष स्वच्छता मोहिम अत्यंत सुनियोजित पद्धतीने राबविण्यात यावी, असेही आदेश सर्व उपायुक्त व संबंधित अधिकाऱयांना देण्यात आले आहेत.


या मोहिमेदरम्यान महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खाते, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, परिरक्षण खाते, आरोग्य खाते, कीटक नियंत्रण खाते, इतर सर्व संबंधित खाती आणि स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या मोहिमे दरम्यान शौचालयांची स्वच्छता व दुरुस्ती यनाकडे विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेचे समन्वयन सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांनी त्यांच्या क्षेत्रात जिथे-जिथे स्वच्छता मोहिम चालू आहे त्या सर्व ठिकाणांना स्वतः भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS