मुंबई ( प्रतिनिधी ) - दरवर्षी महाराष्ट्रात काही ढिकाणी पाऊस कमी पडत असला तरी मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र दरवर्षी पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात तलाव क्षेत्रातील पावसाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून येत असल्याची माहिती पालिकेचे जलअभियंता रमेश बांबळे यांनी दिली. यंदाही पावसाचे दिलासादायक चित्र असून पाऊस लवकर सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली आहे. पाऊस सलग ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत सुरू राहिल्यास त्याचा उपयोग तलावातील पाणी साठून राहण्यास होतो आणि जलाशयांतील पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजनही चांगले करता येते अशी माहिती बांबळे यांनी दिली.
मोडक सागर, तुळशी, विहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, तानसा ही मुंबईसाठी बांधलेली धरणे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात आहेत. या भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे. 2009 मध्ये सर्वात कमी म्हणजे 1700 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. त्यावेळी मुंबईत दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले. गेल्या पाच वर्षात सरासरी तीन हजार मिलीमीटर आणि त्याहून अधिक पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांतील पाऊस
वर्ष मिलीमीटर
2009 1700
2010 3094
2011 3200
2012 2348
2014 2717