वादग्रस्त ठरलेली वि-लन- अप मार्शल योजना पुन्हा मुंबईच्या रस्त्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2015

वादग्रस्त ठरलेली वि-लन- अप मार्शल योजना पुन्हा मुंबईच्या रस्त्यावर

मुंबई ( प्रतिनिधी )- देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला. त्यांनतर पालिकेने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान उपक्रमाला सुरुवात केली. त्यामुळे मुंबई अस्वच्छ करणाऱ्या मुंबईकरांना चाप लावण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून वादग्रस्त ठरलेली  वि-लन- अप मार्शल योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. येत्या दोन महिन्यात वि-लन मार्शल मुंबईतील रस्त्यावर फिरताना दिसणार आहेत हे वि-लन-माशलॅ प्रत्येक वाॅडाॅ नेमणूक केली जाणार आहे

शहरासह उपनगरात सार्वजनिक ठिकाणांवर घाण करणाऱ्या, कचरा टाकणाऱ्रा, पान व गुटखा खाऊन थुंकणाऱ्या आणि शौच करणाऱ्यांवर कारवाई करण्रासाठी महापालिकेने 2007 मध्ये खासगी क्लीन-अप मार्शल रोजना सुरू केली. 24 विभाग प्रशासकीर कार्रालरांच्रा हद्दीत क्लीन-अप मार्शल नेमणूक केली. दरम्यान, दंडात्मक कारवाईपैकी 50 टक्के हिस्सा कंपनीचा आणि उर्वरित 50 टक्के रक्कम महापालिकेच्रा तिजोरीत जमा करण्याचा करार केला. परंतु, या योजनेखाली मार्शल कर्मचाऱ्यांकडून सामान्र मुंबईकरांना दादागिरीचा धाक दाखवत चिरीमिरी आकारू लागले. याबाबत पालिकेकडे तक्रारी वाढू लागल्याने योजना वादात अडकली. त्यामुळे जनतेची लूबाडणूक करणारी ही योजना कायमची बंद केली.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला. त्यानंतर देशातील सर्वच स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेवर भर दिला. याच धर्तीवर मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने जुनी परंतु वादग्रस्त ठरलेली व-लीन अप मार्शल योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत काही फेरबदल करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या अखेरीस याबाबत जाहीरात प्रकाशीत केली जाणार असल्याचे पालिका घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त प्रकाश पाटील यांनी दिली

24 प्रभागात ही योजना सुरू केली जाईल. व-लीन- अप मार्शल योजना राबविणाऱ्या प्रत्येक संस्थांनी त्यांचे संपर्क कक्रमांकाचे फलक संपूर्ण विभागात लावावेत, असे आदेश देण्यात येणार आहेत. तसेच दर आठवड्याला योजने  संदर्भात जनतेला काही अडचणी आल्यास त्याचे निरसन करण्यासाठी एक बैठक लावण्याची सक्ती केली आहे. यामुळे पालिकेकडे येणाऱ्या तक्रांरीचे त्याच ठिकाणी निरसन होईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.

असा आकारला जाईल दंड
कचरा फेकणे                   - 200
थंकूणे                            - 200
लघवी करणे                    - 100
स्नान करणे                      - 500
शौच करणे                       - 100
पशुपक्षांना खानापाणी देणे    - 500
रस्त्यावर वाहन धुणे            - 1000
भांडी, कपडे धुणे                - 200

Post Bottom Ad

JPN NEWS