पालिकेची २५ लाखाची अंडरप्रेशर कटिंग मशीन वापर न केल्याने भंगारात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2015

पालिकेची २५ लाखाची अंडरप्रेशर कटिंग मशीन वापर न केल्याने भंगारात

मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिका मुंबईकर जनतेच्या खिशातून कर वसूल करते. या करामधून मिळणाऱ्या महसुलातून पालिका अधिकाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या मशीन पुरवल्या जातात. परंतू पालिकेचे अधिकारी मात्र अश्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नसल्याने नव्या तंत्रज्ञानाच्या मशिनी भंगारात घालवल्या जात आहेत. असाच प्रकार पालिकेच्या जल विभागाच्या घाटकोपर येथील कार्यशाळेमध्ये झाला आहे. जल विभागाच्या कार्यशाळेसाठी लाखो रुपये खर्चून विकत घेतलेली अंडरप्रेशर कटिंग मशीन गेल्या दोन वर्षात एखादाही वापरण्यात आली नसल्याने भंगारात घालवण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्यक अभियंता परिरक्षण पूर्व उपनगरे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या घाटकोपर जल विभाग कार्यशाळा विभागासाठी मार्च २०१३ मध्ये २५ लाख रुपये खर्चून अंडरप्रेशर कटिंग मशीन खरेदी करण्यात आली होती. अंडरप्रेशर कटिंग मशीनमुळे पाण्याचा प्रवाह जोरात सुरु असतानाही पाण्याच्या पाईपलाईनचे काम करता येते. एखाद्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु असताना पाईपलाईन फुटल्यास या मशीनचा चांगला वापर करता येणे शक्य होते. परंतू पालिकेच्या सहाय्यक अभियंता परिरक्षण पूर्व उपनगरे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या घाटकोपर जल विभाग कार्यशाळा विभागाच्या सहाय्यक अभियंता राठोड यांच्या कार्यपद्धतीमुळे सदर मशीन खरेदी केल्यापासून गेल्या दोन वर्षात एखदाही वापरात आणली नाही. गेल्या २ वर्षात या मशीनचा कधीही वापर केला गेला नाही, लाखो रुपयांची मशीन कधीही साईटवर नेण्यात आली नसल्याने एकाच ठिकाणी पडून मशीन भंगारात गेली आहे. 

मुंबईकर जनतेच्या खिशातून कर रूपाने वसूल केल्या जाणाऱ्या कररुपी महसुलातून पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना नवीन तंत्रज्ञानाच्या मशीन खरेदी करून देत असते. नव्या तंत्रज्ञानाच्या मशीनमुळे काम लवकर आणि सोपे होत असले तरी राठोड सारख्या पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे अश्या नव्या तंत्रज्ञानाच्या मशीन वापर न केल्याने भंगारात घालवल्या जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता व पालिकेतील जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईकर जनतेचा पैसा भंगारात घालवणाऱ्या राठोड सारख्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून पालिकेतील बेजाबदार अधिकाऱ्यांना धडा शिकवावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान २५ लाखाची अंडरप्रेशर कटिंग मशीन भंगारात घालवणाऱ्या सहाय्यक अभियंता परिरक्षण पूर्व उपनगरे विभागाच्या, घाटकोपर जल विभाग कार्यशाळा तसेच "एन" प्रभागातील जल अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. 

Post Bottom Ad

JPN NEWS