शाळेबाहेर चायनीज भेळेच्या विक्रीस बंदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शाळेबाहेर चायनीज भेळेच्या विक्रीस बंदी

Share This
मुंबई : महापालिकेच्या शाळेबाहेर चायनीज भेळेच्या विक्रीस बंदी घालण्याचा शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा ठराव सोमवारी पालिकेच्या महासभेत संमत झाला. या भेळेत 'अजिनोमोटो' मोठय़ा प्रमाणावर घालण्यात येते. त्याच्या सेवनामुळे हाडे कमकुवत होत असल्याने त्याची पालिका शाळेबाहेर विक्री करण्यास बंदी घालावी, असा ठराव श्रद्धा जाधव यांनी मांडला असता तो मंजूर झाला. श्‍वानांना माटुंग्याच्या फाईव्ह गार्डनमध्ये फिरवण्यास आणले जाते. त्यामुळे या श्‍वानांना लहान मुले घाबरत असल्यामुळे श्‍वानांसाठी स्वतंत्र कोपरा राखीव ठेवण्याची मागणी जाधव यांनी केली होती. तीदेखील सभागृहाने मंजूर केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages