यंदा मुंबईकरांवर पाणी कपातीच संकट नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2015

यंदा मुंबईकरांवर पाणी कपातीच संकट नाही


मुंबई (प्रतिनिधी)- यंदा मान्सून जरी लांबला तरी मुंबईकरांना पाण्याचे नो टेंशन आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात जुलै महिन्यापर्यत पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. मात्र, जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यास पाणी कपात किंवा कृत्रिम पावसाचा निर्णय घ्यावा लागले, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी दिली.


मुंबईला तानसा, मोकडसागर, तुलशी, विहार, भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या तलावातून पाणी पुरवठा केला जातो. प्रतिदिन 3750 दशलक्ष पाणी पुरवठा होतो. यंदा मान्सून लाबंणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. परंतु, पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात 53 दिवसाचा पाणी साठा शिल्लक आहे. 2 लाख 1 हजार 106 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षाच्या तूलनेपेक्षा यंदा पाणी अधिक आहे. मात्र, जून महिना जरी कोरडा गेल्यास मुंबईला जूलै महिन्यापर्यंत पाणी पुरवठा होईल. त्यानंतर जलायशातील पाणीसाठा पाहून पाणी कपात किंवा कृत्रिम पाऊसाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती श्रीनिवास यांनी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS