प्रामाणिक जकात अधिकाऱ्यांची तक्रार दाखल न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची युनियनची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रामाणिक जकात अधिकाऱ्यांची तक्रार दाखल न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची युनियनची मागणी

Share This
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या उत्पनाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या जकात खात्यातील अधिकाऱ्यांना गुंडांकडून धमकविणाच्या प्रकारात वाढ होत असून या विरोधात तक्रार करण्यासही पोलिसांकडून नकार दिला जात असल्याने पालिकेच्या उत्पनावरच या मुळे परिणाम होणार आहे. या बाबत म्युन्सिपल मजदूर युनियनचे सेक्रेटरी बने यांनी या मध्ये पालिका आयुक्तांनी लक्ष घालून संबंधीत पोलिसांना  निलंबित करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २५ जून रोजी पाहटे २. ५५  वाजता २५ ते ३० इसम कंटेनर चौकी जवळ आले. त्याच वेळी वाशीच्या दिशेने कंटेनर चौकीजवळ गाडी क्र. एमएच ०२ जेके ४३८८ या इनोव्हा गाडीतून तसेच एमएच०४ डीबी ९३३९ या स्कॉर्पियो गाडीतून १० ते १२ अनोळखी इसम कंटेनर चौकीजवळ येवून उतरले आणि या दोन्ही गाड्यांनी (या मध्ये एका गाडीवर नगरसेवकाचा स्टीकर होता) बुद्धिसंपदा कक्षांच्या गाडीसमोर लावून ही  गाडी पाठलगासाठी  काढण्यात येवू नये म्हणून अडवून ठेवली आणि सर्व जकात  कर्मचार्यांना घेराव घालून तीन कंटेनर्स जकात चुकवून जबरदस्तीने मुंबईत पळविले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्या कंटेनर चे क्रमांक घेवून पोलीस नियंत्रण कक्षास कळविले. या तीन कंटेनर चे क्रमांक एमएच ०४ ईबी ९०४७, एमएच ४३ वाय ९०३ आणि ७७६९ हे आहेत.


अशाप्रकारे सरकारी कामात अडथला आणल्याबद्दल जकात कर्मचारी मानखुर्द पोलिस ठाण्यात माहिती देण्यास गेले. सदरठिकाणी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही ऐकले नाही. त्यानंतर वरील पो. निरीक्षक चोडेकर यांना  ते कर्मचारी भेटले असता ' तुमची तक्रार तुमच्या खात्यामार्फत लेखी स्वरुपात पाठवा', मग चौकशी करू असे उडवाउडवी चे उत्तर दिले. उलट पक्शी निरीक्षक शेषराव राठोड यांनाच त्याचा पत्ता  विचारून घाबरविण्याचा प्रयत्न केला. सदर बाब अत्यंत गंभीर असल्यामुळे सहाय्यक सुरक्षा अधिकारी बर्वे यांनी आपत्कालीन व्याव्यथापन नियंत्रण कक्षास माहिती दिली.

दरम्यान, जकात नाक्यावर अशा गंभीर घटना  नेहमीच घडत असतात. अशा, वेळी अनेकांना आपले प्राण धोक्यात घालावे लागले आहेत. पालिकेच्या महसूलसाठी काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण न देणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी म्युन्सिपल मजदूर युनियनचे सेक्रेटरी बने यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages