गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावात अधिक पाणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावात अधिक पाणी

Share This

मुंबई ( प्रतिनिधी ) (25-6-2015) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडला असून सुमारे 25 टक्के पावसाची नोंद झाली आहे . त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावात या कालावधीत जास्त पाणी साठा उपलब्ध असल्याने मुंबईकरांची पाणी टंचाई दूर झाली आहे


यंदा पावसाने सुरुवाती पासूनच मुंबई सह राज्यात चांगली सुरुवात केली तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात ही चांगली सुरुवात केली आहे. गेल्या पाच ते सहा दिवस कोसळण्या-या पावसाने तलाव क्षेत्रातही दमदार सुरुवात केली त्यामुळे तलाव क्षेत्रात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा या कालावधीत 25 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सध्या सातही तलावात मिळून 3 लाख 14 हजार 723 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध झाला आहे.आता पयॅत तलाव क्षेत्रात 4698 . 80 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मोडकसागर मध्ये 482 .80 , तानसा मध्ये 396 .00 , विहार मध्ये 1030 .20 , तुळशी मध्ये 1135 .00 , अप्पर वैतरणा मध्ये 593 . 20 , भातसा मध्ये 531 .00 , आणि  मध्य वैतरणा मध्ये 530 . 60 मि. मि. पावसाची  आता पर्यंत नोंद झाली आहे सध्या तलाव क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस पडत असून तलावांची पातळी वाढत आहे त्यामुळे मुंबईकरांवरची पाणी कपातीची तलवार दूर झाली आहे असाच पाऊस पुढे पडल्यास तलावाची पातळी झपाटय़ाने वाढून तलावे भरुन वाहू लागतील असा अंदाज वतॅवण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावात अधिक पाणी
      वषॅ                                 पाणी साठा (दशलक्ष लिटर )
2015                                    314723
2014                                    141049
2013                                     310662
2012                                      69952

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages