हिट एंड रन केस' चा आरोपी बनणार मुंबई अग्निशमन दलाचा प्रमुख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2015

हिट एंड रन केस' चा आरोपी बनणार मुंबई अग्निशमन दलाचा प्रमुख


मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणा-या  मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी प्रभात रहांगले यांची नियुक्ति करण्याच्या तयारीत आहे. वर्ष 2005 ला गोरेगाव येथील एका 'हिट एंड रन केस' मधील प्रभात रहांगले आरोपी असून न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना पालिकेचा सामान्य प्रशासन विभाग त्यास दुर्लक्ष करत आहे. याबाबत निर्णय येण्याची प्रतिक्षा करण्याऐवजी पालिकेचे काही उच्चपदस्थ अधिकारी घाईघाईत रहांदले यांच्या नेमणुकीच्या तयारीत आहे.

21 डिसेंबर 2005 रोजी गोरेगाव परिसरात रहांगले यांनी 'हिट एंड रन केस' केली होती. या प्रकरणात ऑटो रिक्षा चालक जनाई प्रसाद रामबहादुर शर्मा यांचा मृत्यु झाला होता.रहांगले यांनी शर्मा यास जखमी अवस्थेत सोडून औषधोपचार न करता व पोलिसांना वर्दी न देता पळून गेले होते. याबाबत गोरेगाव पोलिसांनी दिनांक 1 एप्रिल 2006 रोजी माननीय महानगर दंडाधिकारी, बोरीवली येथे रहांगले यांच्या विरोधात गुन्हा भादंविचे कलम 304 (अ) आणि 134 (अ) (ब) मोटर वाहतूक कायदा प्रमाणे अपराध केल्याचे दोषारोपपत्र दाखल केले गेले आहे. सदर प्रकरणाची पुढील तारीख 1 जुलै 2015 असताना अश्या वादग्रस्त व्यक्तीला एवढया जबाबदारीच्या पदावर नियुक्त करून प्रशासन कोणता पायंडा घालू इच्छीते असा प्रश्न निर्माण होतोय. आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करत सांगितले की निर्णयाची प्रतिक्षा करण्याऐवजी पालिका प्रशासनला इतकी घाई का आहे आणि यामुळे पालिका तसेच मुंबई अग्निशमन दलाच्या प्रतिमेला निर्णय आल्यानंतर तडा जाण्याची भीती व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS