मुसळधार पावसात ४१५ वृक्षांनी गमावले 'प्राण' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2015

मुसळधार पावसात ४१५ वृक्षांनी गमावले 'प्राण'

मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात तब्बल ४१५ वृक्षांनी 'प्राण' गमावले असून ५१६ झाडांच्या फांद्याही तुटल्या आहेत. मुंबईत वृक्षराजींचे प्रमाण कमी होत असल्याची ओरड होत असताना दोन दिवसांच्या पावसात ४१५ झाडे उन्मळून पडली तर झाड कोसळून त्यात तीनजण मृत्युमुखी पडले आहेत.


दरवर्षी पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडला की, त्याचा तडाखा झाडांनाच बसतो. जून २0१३ मध्ये याचमुळे जमीनदोस्त झालेल्या झाडांची संख्या ३७२ होती. हे धक्कादायक वास्तव लक्षात घेऊन वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शहरातील धोकादायक वा कमकुवत झालेल्या वृक्षांचे 'ऑडिट' करण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या आठवड्यात जी झाडे कोसळली होती, त्यांची मुळे का कमकुवत झाली याची माहिती मागवली आहे, असे समितीचे सदस्य अभिजीत चव्हाण यांनी सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS