आरोग्य समिती अध्यक्षांना फ्लिमसीटीची काळजी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2015

आरोग्य समिती अध्यक्षांना फ्लिमसीटीची काळजी


मुंबई (प्रतिनिधी)- पावसाळ्यात साथीचे आजार परसतात. फ्लिमसीटीमध्ये डेग्यू, मलेरियाचे प्रमाण अधिक असतो. 24 तास याठिकाणी कर्मचारीवर्ग काम करीत असल्यामुळे प्रथम लागण होते. मागीलवर्षी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी पहिल्यांदा आरोग्य तपासणी करा, असे आदेश सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा सुनिता यादव यांनी दिले. पावसाळापूर्व आज पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. मुंबईकरांपेक्षा काळजीपेक्षा अध्यक्षांना फ्लिमसीटीच भारी काळजी पडल्याचे दिसते
.
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजाराने मुंबईकर बेजार होतात. त्यामुळे पावसाळापूर्व तयारीची जोरदार सुरूवात पालिकेने केली आहे. रस्ते, नाल्यांसह आरोग्याबाबत आढावा बैठकी सुरू आहेत. ताप, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, हिवतापसह अन्य विविध साथीचे आजार पसरतात. याचा वेळीच नायनाट करण्यासाठी पालिका आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. यासाठी लालपावडर, किट्स, औषधे पुरविण्यात येणार आहेत. 24 वार्डात पावसाळी कॅम्प भरविण्यात येतील. नगरसेवकांच्यामार्फत हे कॅम्प सुरु केले जातील. मात्र, याबाबत त्यांची परवानगी घेण्यात येत आहे. तसेच गटारात पाणी साचल्यामुळे किडे निर्माण होतात. ह्या किड्यांवर औषध फवारणी केली जाणार आहे.

दरम्यान, फ्लिमसिटीमध्ये चित्रिकरणासाठी स्टेज उभारण्याकरिता कर्मचारी 24 तास कार्यरत असतात. मागील वर्षी एका कामगारांचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणच्या कर्मचाऱ्यांची त्वरित आरोग्य तपासणी करा, असे आदेश दिले. त्यांच्या या आदेशामुळे मुंबईकरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाला आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारामुळे पालिकेची सर्व रुग्णालये व दवाखाने फुल्ल असतात. असे असताना समिती अध्यक्षांना मात्र फ्लिमसिटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घोर लागला आहे. अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे मुंबईकर नाराजी व्यक्त करीत आहेत.

अनधिकृत चायनीज गाड्यांचा दर्जा तपासणार
शहराती फुटपाथ, रस्त्यांवर आणि गल्लोगल्ली चायनिजसह अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या राहतात. यांच्याकडून निकृष्ट दर्जाचे मटेरिलय वापरले जाते. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे चायनिजसह अन्य खाद्यपर्दाथांचा दर्जा तपासण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये दोषी आढळणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS