नाशिक :उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी त्यांच्या जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
२०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांचे प्रवेश १ जून पासून सुरु करण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती देताना कुलगुरू डॉ. साळुंखे पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे निरनिराळ्या प्रकारचे सुमारे १५४ हून अधिक शिक्षणक्रम असून चालू शैक्षणिक वर्षात त्यात नवीन २१ शिक्षणक्रमांची भर पडली आहे. त्यातील अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निरनिराळ्या शिक्षणक्रमांसाठी दहावी, बारावीच्यायशावरच शैक्षणिक कारकीर्द अवलंबून असल्याने प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करतो. मात्र त्यानंतरही शैक्षणिक स्पर्धेत टिकू शकतोच असे नाही.यामुळे दहावी, बारावी परीक्षेत अपयश आलेल्यांना आता हताश होण्याची आवश्यकता नाही. नोकरी, व्यवसाय सांभाळून उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे. कमीकालावधीत अनेक कौशल्ये आणि अनेक विषयातलेज्ञान घेण्याचे हे युग आहे. ज्ञान आणि कौशल्ये सततअपडेट करणे गरजेचे झाले आहे. व्यवसाय सांभाळून शिक्षणाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठाने काम करता-करता शिक्षण हा दूरस्थ शिक्षण पद्धतीतला उत्तम पर्याय दिला आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशास्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्र, निरंतर शिक्षण, आरोग्य विज्ञान, कृषिविज्ञान या विद्याशाखा आणि शैक्षणिक सेवा विभागाच्या अनेक शिक्षणक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. या विद्याशाखांच्या पदवी,पदविका आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांखेरीज युवावर्गात अतिशयलोकप्रिय झालेल्या मीडिया क्षेत्रात जाण्यासाठी पत्रकारिता पदवी, पदविकाशिक्षणक्रम, बी.ए.(मराठी, हिंदी आणि उर्दू) बी.कॉम. (मराठी आणिइंग्रजी), मानवी हक्क, ग्रंथालय व्यवस्थापन, गांधी विचार दर्शन, ग्राहक संरक्षण, सहकार व्यवस्थापन, हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन, इन्शुरन्स,बँकिंग, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान,कॉम्प्यूटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर, मोबाइल दुरुस्ती, शिवणकाम, ब्युटिपार्लर व्यवस्थापन, प्लंबर, फिटर, वायरमन, वाहन दुरुस्ती, औद्योगिक सुरक्षा,शालेय माहिती तंत्रज्ञान, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, सायबर सिक्युरिटी, ऑटोमोबाइल, टीव्ही-व्हीसीडी मॅकेनिक, फायर अॅडसेफ्टी इंजिनिअरींगमॅनेजमेंट,अन्नप्रक् रिया आणि संवर्धन, कृषिशास्त्र, शेतीशास्त्र असे वेगवेगळे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्याची संधी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे.
अभ्यासक्रम
रिक्षा, टॅक्सीचालक हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले असतात. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून उच्च शिक्षण देऊन समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी बी.ए. (रोड ट्रान्सपोर्टेशन), उद्योग जगताच्या आधुनिक गरजांसाठी सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रॉडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट, बी.कॉम. फायनान्स आणि बँकिंग, लष्करी जवानांसाठी पूर्वतयारी आणि बी.ए., यंत्रमाग कामगारांच्या कौशल्याला समाजमान्यता देण्यासाठी बी.ए. इन टेक्सटाईल, घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्याकर्मचाऱ्यांसाठी बी.ए. ग्राहकसेवा, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठीबी.ए. (पोलीस प्रशासन), नेव्हल डॉकयार्ड कर्मचाऱ्यांसाठीअभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका, सलून व्यवसाय पदविका, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स) आणि एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) हे शिक्षणक्रम सुरूकरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही शिक्षणक्रम मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतही उपलब्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी.एस्सी. (ड्रग सायन्स) शिक्षणक्रम ल्युपिन फार्मास्युटीकलच्या सहकार्याने सुरू आहे. तसेच (एम.कॉम., एम.एस्सी.) विषय संप्रेषण, बी.एड.,एम.एड., बी.ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी /पदविकाअसेअनेकशिक्षणक्रम उपलब्ध आहेत. यापैकी संगणकाचे बहुतेक शिक्षणक्रम हे ऑनलाइन आहेत. याशिवाय सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी. एड., एम.एड.,शालेय व्यवस्थापन पदविका, एम.ए., बी.टेक. (मरीन इंजिनिअरिंग), एम.ए. (लोकप्रशासन) इ.चा समावेश आहे.
वैशिष्ट्ये : या विद्यापीठाने रोजगाराभिमुख शिक्षणक्रमांवर अधिक भर दिलेला आहे. शिक्षणक्रम शुल्कात अध्ययन साहित्य, तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, वेब रेडीओ, दृक-श्राव्य माध्यम आणि मोबाईलद्वारे मार्गदर्शन, पुढील शिक्षणाच्या (व्हर्टिकल मोबिलिटी) उपलब्ध, कमवा व शिका योजनेचा लाभ, एकावेळी अधिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्याची संधी, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण केल्यास याच वर्षी प्रथम वर्ष पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेता येईल. अशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यास त्यांना बारावी शैक्षणिक अर्हतेचे अर्थात पोलीस शिपाई भरती वा शासकीय किंवा खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत किंवा बढतीत संधी अथवा अन्य लाभ मिळू शकतात.
नवीन शिक्षणक्रम : या शैक्षणिक वर्षापासून निरनिराळ्या विद्याशाखांतर्गत २१ नवीन शिक्षणक्रम सुरु करण्यात आलेत. त्यात बीबीए (बीपीएम), बी.एस्सी. (सीएसए), डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट,अॅडव्हान्स डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल सायन्स, इंडस्ट्रीयल कॉम्प्यूटर सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन, बीबीए (बिझिनेस प्रोसेसमॅनेजमेंट), चर्मकला कौशल्ये विकसन, मूल्य शिक्षण, पदव्युत्तर पदविकाडिप्लोमा इन इ-एज्युकेशन इन डिजिटल सोसायटी, बी.एस्सी. (जनरल), बी.एस्सी. (नॉटिकल सायन्स), एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स आणि एम. एस्सी. (एनव्हायरमेंटल सायन्स), अॅक्युप्रेशर (प्रमाणपत्र), डिप्लोमा इन अॅक्युप्रेशर आणि हॉस्पिटल असिस्टट तसेच बी.एस्सी. (ऑटोमोबाईलटेक्निक्स), बी.एस्सी. (कन्स्ट्रक्शन प्रॅक्टीसेस), बी.एफ.ए. (चित्रकला/ मूर्तीकला/सिरामिक), एनर्जी ऑडीट अॅडमॅनेजमेंट, एमबीए (फॅशन बिझिनेस) या शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
कमवा व शिका योजनेंतर्गत शिक्षणक्रम : औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या सहकार्याने शिका व कमवा योजनेंतर्गत विद्यावेतन आणि नोकरीची संधी असलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स), डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स, हॉस्पिटल सहायक, डिप्लोमा इन फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग, अभियांत्रिकी पदविका, बीबीए (बीपीएम), बी.एस्सी. (सीएसए) आणि डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट या शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
घरपोच पुस्तके : या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक महिन्याच्या कालावधीत अध्ययन साहित्य घरपोच पाठविण्यात येईल.
ऑनलाइन सेवा : विद्यापीठाच्या निरनिराळ्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेपासून निकालापर्यंत सर्व प्रकारच्याऑनलाइन सेवा पुरविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्याच्या विविध भागात सुमारे ५०० हून अधिक ऑनलाइन सेवा केंद्रे असतील.
अ.नं.
|
सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे नाव
|
संपर्क
|
१.
|
कल्पतरू बहुउद्देशीय संस्था, किन्हाळा, जि. बुलढाणा.
|
९७३०१३७९९२, ९९६०३०५८७
|
२.
|
डेटी वर्ड, ३ रा मजला, शालीमार, नाशिक.
|
९४२२५८७५६
|
३.
|
ग्रामीण विकास शिक्षण संस्था, येवदा, अमरावती.
|
९४२२१५६५७४
|
४.
|
एज्युकेशन रिसोर्स अॅड प्रोसेसमॅनेजमेंट, कंपनी. प्रा. लि. सीबीडी बेलापूर, मुंबई.
|
९९२००१७५०९
९८१९९२२०१०
|
५.
|
युनिव्हर्सल ट्रेनिंग सेंटर प्रा.लि. पुणे.
|
९८५०८११४३३
|
६.
|
एकात्मिक विस्तार सेवा प्रा. लि. लोणी काळभोर, पुणे.
|
७५८८५४५६९८
|
प्रवेश प्रक्रिया : १ जून ते ३० जून २०१५
विलंब शुल्क : रु. १००/- सह १ जुलै ते २३ जुलै
अतिविलंब शुल्क : रु ५००/- सह २४ जुलै ते २५ ऑगस्ट २०१५
(पदव्युत्तर शिक्षणक्रम सत्र पद्धती व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील शिक्षणक्रम वगळून)
दरम्यान कृषिविज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांसाठीची अंतिम मुदत १५ जून २०१५ पर्यंतच असून विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
आपल्या आवडत्या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी त्वरित जवळचे अभ्यासकेंद्र, विभागीय केंद्रावर अथवा (०२५३) २२३१७१४, २२३१७१५, २२३०२२७ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाची http://ycmou. digitaluniversity.acसंकेतस्थळास भेट द्यावी. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही शंका/ अडचणी असल्यास http://ycmou.ac.inया संकेतस्थळावर उजव्या बाजूच्या खालील कोपऱ्यात इ-मेल बेस सपोर्ट प्रवेश विभागनिहाय उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करून माहिती विचारू शकतील.
या पत्रकार परिषदेस निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे, वित्त अधिकारी पंडित गवळी, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटूळे, डॉ. हेमंत राजगुरू, जयवंत खडताळे आणि संतोष साबळे हे उपस्थित होते.

