वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) भागात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. या भागात ३१० नंबरच्या डबल डेकर बसने स्कूटीला धडक दिली. यात दोन महिलाचा मृत्यू झाल्याचे कळते.
अपघातात जखमी झालेल्या टीना मोटनी (२७) ) आणि संध्या कोठारी (२६) यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संबंधित घटनेसाठी बसचालक नवदेव आनंद (४५) यावर आयपीसी च्या ३०४ (A) आणि २७९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव डबल डेकर बस बांद्रा इथून कुर्ला रेल्वे स्टेशन येथे जात होती. बस वळत असतानाचं सदर तरुणींच्या स्कूटीला बसची पाठीमागून धडक लागली. त्यानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांना त्याला वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथे अटक केली