लोकल फलाटाला धडकली - ५ जण जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकल फलाटाला धडकली - ५ जण जखमी

Share This
गेल्या दोन आठवड्यांपासून रेल्वेचे रडगाणे सुरू असतानाच रविवारी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास शटींगच्या वेळी लोकल फलाटाला धडकली.
प्राथमिक माहितीनुसार, गाडी स्थानकात येताना ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरात होती की लोकल फलाटावर चढली. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. लोकलचे मोठे नुकसान झाले असून मोटरमनसह ५ जण जखमी झाले आहेत. त्यात तीन महिलांसह दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकलसेवेवर याचा परिणाम झाला. 


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages