स्कूल बसना टोलमधून वगळण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2015

स्कूल बसना टोलमधून वगळण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा - रामदास आठवले

मुंबई / प्रतिनिधी - राज्य सरकारने ज्याप्रमाणे काही  टोल नाक्यांवर लहान चारचाकी वाहनांना टोलमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे स्कूल बसेसना  टोलमधून वगळण्याचा निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्श खासदार रामदास आठवले यांनी केली आहे.


स्कूल बसना टोलमधून वगळण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला होता मात्र त्याचे आदेश काढले नसल्याने टोल नाक्यावर स्कूल बस कडून टोल वसूली सुरु आहे. हा टोल सुरु राहिल्यास त्याचा भुर्दंड विद्यार्थी व पालकांना बसणार आहे. स्कूल बसच्या दरात दरमहा किमान तीनशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे . स्कूल बस संघटनेने तसे स्पष्ट केले आहे त्यामुळे राज्य सरकारने स्कूल बसेसना टोल मधून वगळण्याचा निर्णय घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करावी व पालकांना दिलासा घ्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.स्कूल बसकडून घेण्यात येणा्रया टोलची रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेण्यात येणार असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे सरकारने याची त्वरित दखल घ्यावी व पालकांना दिलासा घ्यावा असे आठवले म्हणाले.स्कूलबसेसना टोल माफ करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी दिलेे होते. त्यासाठी  लवकरच सुधारित परिपत्रक काढणार असल्याचं त्यांनी सांगितले होते. त्याची अंमलबजावणी करावी असे आठवले म्हणाले

Post Bottom Ad

JPN NEWS