रविवारी व सार्वजनिक सूटटीच्या दिवशी RF-ID स्मार्टकार्डची आवशकता नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2015

रविवारी व सार्वजनिक सूटटीच्या दिवशी RF-ID स्मार्टकार्डची आवशकता नाही

मुंबई (प्रतिनिधी): बेस्टचे भाडे वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशी कमी झाले आहे. जवळपास दोन लाख प्रवाशी प्रवाश करत नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. जे रोजचे प्रवाशी आहेत ते  रविवारी व सार्वजनिक सूटटीच्या दिवशी प्रवास करण्यास टाळतात. त्यामुळे बेस्टला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. रविवारी व सार्वजनिक सूटटीच्या दिवशी प्रवासी संख्या वाढविण्यासाठी दैनंदिन बसपासकरिता R F- I D स्मार्टकार्डची सक्ती न करण्याचा निर्णय बेस्ट ने घेतला आहे. 


सध्यस्थितीत बेस्ट उपक्रमाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीकरिता सर्वसाधारण, मर्यादित आणि जलद बससेवांवर ७० रु. व वातानुकुलीत बससेवांवरील २०० रु. चा  दैनंदिन बसपास उपलब्ध करण्यात आलेला आहे. या बसपासचा लाभ घेण्याकरिता  R F- I D स्मार्टकार्ड शिवाय प्रवास करू शकतात. अनेक प्रवासी दैनंदिन बसपासचा लाभ घेत आहेत. मात्र, रविवारी व सार्वजनिक सूटटीच्या दिवशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असते. रविवारी प्रवासी हे प्रामुख्याने पर्यटक आणि विशिष्ट कारणाकरिता प्रवास करणारे  प्रवासी असतात. अशा बहुतांश प्रवासंकडे स्मार्टकार्ड उपलब्ध नसतात. परिणामी अशा प्रवासांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे रविवारी व सार्वजनिक सूटटीच्या दिवशी दैनंदिन बसपासाकरता R F- I D स्मार्टकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून बेस्ट समितीत मंजुरी साठी आणला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS