खोटे जात प्रमाणपत्र - भाजपाच्या दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2015

खोटे जात प्रमाणपत्र - भाजपाच्या दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद रद्द

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे गेले ३ वेळा नगरसेवक पद भूषवत गटनेता, बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविणारे दिलीप घनश्याम पटेल यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. पटेल यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला द्वितीय क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार जयंती जीवनभाई सिरीयो यांनी लघुवाद न्यायालयात आवाहन दिल्या नंतर निवडणूक विभागाने पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

मुंबई महानगर पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे दिलीप पटेल हे १३ वर्षे नगरसेवक होते. ते तिसऱ्यांदा २०१२ च्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ६३ मधून मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आले होते. २०१२ मध्ये निवडणूक लढवताना त्यांनी "लेवा पाटीदार" या जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. परंतू त्यांनी जोडलेल्या प्रमाणपत्रात लेवा पाटीदार हि जात सिद्ध होत नव्हती, पटेल यांनी कागदपत्राच्या नोंदी मध्ये फेरफार करून जातीचा दखल व जात वैधता प्रमाणपत्रात मिळवल्याचे सिद्ध झाले. तसेच जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर व भूमी संपादन अधिकारी, मुंबई उपनगर यांनी वितरीत केलेला लेवा पाटीदार या जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवून जिंकून येणाऱ्या नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र खोटे ठरल्यास आयुक्तांनी अश्या नगरसेवकाचे पद विनाविलंब रद्द करावे असे नियम आहेत. या नियमानुसार पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त एस. श्रीनिवास यांनी १७ फेब्रुवारी २०१२ पासून दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे गटनेते, बेस्ट समितीचे अध्यक्ष, पालिकेमध्ये गेले १३ वर्षे विविध पदे भूषवणारे दिलीप पटेल यांचे जात प्रमापापात्र खोटे ठरल्याने पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने २०१७ मध्ये शत प्रतिशत भाजपाचे स्वप्न बघणाऱ्या भाजपाला जोरदार धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS