मुंबईची ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2015

मुंबईची ठप्प

मुंबई / प्रतिनिधी - सततच्या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. पहाटे साडेपाच वाजल्यापासून सीएसटीकडून अप आणि डाऊन दिशेची मध्य तसेच हार्बर मार्गवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील ट्रॅकवर जागोजागी पाणी साठल्यामुळे लोकल चालवणे शक्य नसल्याने अप तसेच डाऊन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात झाली आहे.

मुंबई आणि उपनगरामध्ये काल रात्रीपासून पावसाची संतत धार सुरु असल्याने जागोजागी पाणी साठले आहे. त्यामुळे पहाटे पासूनच मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका बसला आहे. पहाटे साडेपाच पासून सीएसटी स्थानकातून एकही लोकल सुटली नाही. तसेच अप दिशेला येणा-या लोकलही पूर्णपणे बंद आहेत. सीएसटी स्थानकामध्ये पहाटे साडेपाच पासूनच 'मध्य तसेच हार्बर मार्गावरील लोकल सेवा जागोजागी पाणी साठल्याने बंद असून ती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याचे सर्व प्रयत्न सुरु असल्याच्या अनाऊन्समेन्ट केल्या जात आहेत.

मागील दहा तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे. यामध्ये प्रमुख्याने हिंदमाता, घाटकोपर, कुर्ला, भांडूप, अंधेरी, जूहू, सायन स्टेशन, मालाड स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबईमध्ये ठीकठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पालिकेने ११९ पंप लावल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई मध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मुंबईमध्ये येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS